
कामशेत:
श्री.विठ्ठल परिवार, मावळ आणि विश्व फाउंडेशन शिवपुरी, अक्कलकोट आयोजित महाराष्ट्रातील भव्य सामूहिक अग्निहोत्र सोमवार दि. १ जानेवारी २०२४ रोजी सायं. ४:३० वाजता श्री.विठ्ठल परिवार मावळ सप्ताह मैदान येथे होणार आहे.
श्री.विठ्ठल परिवार मावळचे संस्थापक आमदार सुनिल शंकरराव शेळके व विठ्ठल परिवार यांच्या संकल्पनेतून कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या मैदानावर ७ हजार भाविकांच्या हस्ते सामूहिक अग्निहोत्र होणार आहे.
श्री.स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट यांच्या आज्ञेनुसार स्थापन करण्यात आलेल्या दिव्य गुरुपीठावरून परमसद्गुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट यांनी सर्वांच्या कल्याणासाठी ‘नित्य अग्निहोत्र’ करण्याचा शुभसंदेश दिलेला आहे.
अक्कलकोट धर्मपीठ श्री गुरुमंदिर येथून परमसद्गुरू श्री. गजानन महाराज यांच्या चैतन्य पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा होणार आहे.घरा घरात अग्निहोत्र…मना मनात अग्रिहोत्र… अशी ही संकल्पना आहे.हा
संपूर्ण कार्यक्रम निःशुल्क आहे.डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले
अध्यक्ष- गुरुमंदिर व विश्व फाऊंडेशन, शिवपुरी, अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निहोत्र कार्यक्रम पार पडेल.
- हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची शैक्षणिक सहल
- मुरलीधर गरूड यांचे निधन
- सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब दत्तात्रय कराळे (पाटील) बिनविरोध निवड
- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील कार्य अभिमानास्पद
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे




