श्री. शांतीनाथ, श्री आदिनाथ मुर्तीपूजक जैन संघातर्फे आयोजित सामुदायीक “छः” पालीत संघ
तळेगाव स्टेशन :
श्री शांतीनाथ, श्री आदिनाथ सकल जैन संघ द्वारा सामुहिक लाभार्थी परिवार तर्फे पहिल्यांदा “छ:” री पालीत संघ तळेगाव स्टेशन ते पाबळ तिर्थ येथे (दिंडी यात्रा) झाली.
पहिला मुक्काम तळेगाव ते भंडारा लॉन्स (१० किमी), दुसरा मुकाम भंडारा ते महाळुंगा (९ किमी), तिसरा मुक्काम महाळुंगा ते खेड (१४ किमी), चौथा मुक्काम खेड ते गोसासी (१२ किमी), पाचवा व अंतिम गोसासी ते पाबळ जैन तिर्थ (८ किमी). येथे संपूर्ण ट्रस्ट मंडळाचे ट्रस्टीगण स्वागतासाठी हजर होते.
सर्व जण वाजत-गाजत पाबळ मंदिरात दर्शन घेऊन पुढे बाकीची व्यवस्था धर्मशाळेत महाप्रसादाचा आस्वाद सर्व जणांनी घेऊन सामुहिक लाभार्थी परिवारांना संघवी बनण्याची माळ अर्पण करून संघवी ही पदवी बहाल करण्याकरिता मुनि हिरसागरजी म.सा. बाल मुनि विरभद्रसागरजी म.सा., साध्वी नमिवर्षाश्रीजी, नेहावर्षाश्रीजी, नितवर्षाश्रीजी, भक्तिवर्षीश्रीजी, हिववर्षाश्रीजी म.सा. यांच्या सानिध्यात देण्यात आली.
भव्य मणीभद्र पूजन करण्यात आले. हे नियोजन करण्याकरिता श्री तळेगाव स्टेशन जैन सकल संघ, श्री नुतन ट्रस्ट मंडळ, श्री धर्मनाथ जैन युवक मंडळ, श्री ऋषभशांती विहार सेवा ग्रुप, व जैन महिला मंडळे उपस्थित होते. तसेच रोज सकाळी (पाचही दिवस) पहाटे ४.३० वा. राइय प्रतिक्रमण, पहाटे ५.३० वा. सामुदायिक चैत्यवंदन व भक्तांबर पाठन, स ६.०० वा. चालत संघ प्रयाण, स ९.३० ते ११.३० स्नातत्र पूजा व जिनपुजा, १२.०० दुपारी महाप्रसाद, दुपारी ३ ते ४.३० प्रवचन, सायं ६.१५ भक्ती संगीत व सामुहिक आरती, ७.३० देवसीय प्रतिक्रमण, रात्री ८.०० संथारा अशा प्रकारे “छ:” पालीत चालत संघ (दींडी यात्रा) संपन्न झाला. अशी माहिती तळेगाव स्टेशन श्री शांतीनाथ-आदिनाथ जैन मंदिरा तर्फे देण्यात आली.

error: Content is protected !!