तळेगाव दाभाडे:
येथे संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. हरीनामाच्या गजरात पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संत भगवान बाबा विचारमंच व संत भगवान बाबा पुरुष बचत गटातर्फे या सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले.
  संतपूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. हरिपाठ सारे वैष्णव दंगून गेले. संस्कृतविशारद आचार्य ह.भ. प. हरिदास पालवे महाराज यांचे सुश्राव्य असे ‘संत महिमा’ या विषयावर हरीकीर्तन संपन्न झाले. आमदार सुनील शेळके उपस्थित होते. आमदार सुनिल शेळके म्हणाले,” ‘मी भगवान बाबा, वामनभाऊ महाराज व स्व. गोपीनाथ मुंढे यांचा भक्त आहे. त्यांच्यावर माझी खूप श्रद्धा आहे. त्यांचा वसा घेऊन माजीमंत्री पंकजा मुंढे व कृषिमंत्री धनंजय मुंडे  यांचे माझ्यावर प्रेम आहे.  आपणांस मावळात कसलेही सुख दुःख असेल तर त्यात सहभागी असेन.’
पुढे म्हणाले,”. भाऊ बाबांचे  मंदिर उभारण्याचा आपला मानस आहे,त्यासाठी आवश्यक ती मदत व निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील.  नगरसेवक निखिल भगत, अनिकेत भेगडे, सचिन भांडवलकर उपस्थित होते.
नाथबाबा खाडे,अशोक कराड, श्रीराम तांदळे, संजय वायभासे, डॉ गोपाळघरे, शिवकुमार दहिफळे  व सर्वच सदस्यांनी कष्ट घेतले. व पहिल्याच वर्षी उत्तम कार्यक्रम पार पाडला. सर्व उपास्थित महिलांनी संक्रांतीनिमित्त तिळगुळ व वाण वाटप केले.

error: Content is protected !!