इंदोरी:
प. पु. सद्गुरु श्री गगनगिरी महाराज यांच्या पिंपरणे संगमनेर  ते खोपोली पालखी सोहळ्याचे चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) येथे आनंदात व उत्साहात स्वागत करण्यात आले.
पालखीचे स्वागत ढोलताशा आणि लेझीमच्या गजरात करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पुष्पवृष्टी करण्यात आली.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी तीन वेगवेगळे नृत्याविष्कार सादर केले.दिंडीतील  भक्तांनी हरिपाठ केला आणि महाराजांची आरती घेण्यात आली.
समस्त इंदुरीकर, विद्यार्थी वर्ग आणि पालक मोठ्या संख्येने या आनंद सोहळ्या सहभागी झाले.आणि सर्वांनी महाराजांचा आशीर्वाद घेतला. महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

error: Content is protected !!