वडगाव मावळ:
श्री छत्रपती शिवाजी मंदिर अँड ज्युनिअर कॉलेज, कान्हे येथे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या एन एम एम एस या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे चे संचालक सोनवा गोपाळे , सरपंच विजय सातकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेचे शालेय समिती अध्यक्ष समीर सातकर, हिरामण बिबवे बिबवेवाडी पाटील, पत्रकार सोपान येवले , पत्रकार प्रफुल्ल ओव्हाळ उपस्थित होते
.या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव संतोष खांडगे साहेब आणि शालेय समितीचे अध्यक्ष यादवेंद् खळदे
शुभेच्छा दिल्या.
अशा परीक्षांमधूनच स्पर्धा परीक्षांची तयारी होते, पुढे प्रशासकीय अधिकारी घडू शकतात असे खांडगे म्हटले
यावेळी गोपाळेनी मार्गदर्शन केले. सरपंच व सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या परीक्षेची तयारी शाळेचे शिक्षक शहाजी लाखे, राम कदमबांडे, रियाज तांबोळी, सोमनाथ साळुंके ,श्रद्धा मोहोळ, दिक्षा पवार यांनी करून घेतली.
सूत्रसंचालन.श्रद्धा मोहोळ यांनी केले. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सविता चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन