टाकवे बुद्रुक:
अंदर मावळ भागातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ पुरस्कृत
बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल व सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडियम हायस्कूल मधील वार्षिक स्नेहसंमेलन 2023-24 मोठ्या उत्साहात पार पाडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेस्टँम्प कंपनीचे विभागीय संचालक श्री शरद गेहलोत, कायनेटिक टायिझिंग कंपनीचे प्रमुख व्यवसाय विकास अधिकारी श्री गौतम लोढा, गेस्टँम्प कंपनीचे गटप्रमुख श्री संतोष चव्हाण, मा उपसरपंच दत्ता असवले, श्री अनिल मालपोटे ,रुपेश घोजगे, नामदेव कोंडे विजय सातकर ,विकास आसवले गजानन खरमारे नारायण ठाकर, नामदेव शेलार, दत्ता असवले, प्रिया मालपोटे, ज्योती आंबेकर, प्रकाश मालपोटे ,रवी पवार, रामनाथ असवले, दशरथ जांभुळकर, सागर म्हाळसकर, शेखर मालपोटे,आदी कार्यक्रमास उपस्थित होते. टाकवे बुद्रुक या गावामध्ये हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच अगदी उत्साहात पार पडला
२००७ साली शाळेची सुरूवात केली.
ग्रामीण भागातील मुले इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी येतात.इयत्ता दहावी च्या पाच बॅचेस पासहोऊन गेल्या.
या स्कूलमध्ये टाकवे ,फळणे, खांडी, सावळा ,वाहनगाव ,वडेश्वर, माऊ, कशाळ , कल्हाट,पवळेवाडी , किवळे, बेलज, राजपुरी ,घोनशेत कचरेवाडी, साई, नानवली, पारोडी अशा अनेक ग्रामीण भागातून विद्यार्थी या स्कूलमध्ये येत आहेत विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणहून येतात शेतकरी कुटूबियांतील तरूणांनी शाळा सुरू केली.कमीत कमी डोनेशन घेतले जाते.
माफक फी आहे.वेगवेगळे उपक्रम असतात दरवर्षी शाळेचा निकाल.१०० टक्के निकाल असतो. विद्यार्थाना मोठी स्वप्नं राबविण्याचा आत्मविश्वास येथे पहायला मिळतो. या स्कूल मधून अनेक विद्यार्थी वकील ,डी फार्मसी ,इंजिनियर झाले अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव चिंधु असवले व सचिव श्री रामदास जाखोबा वाडेकर यांनी दिली.
उपस्थित संचालक मंडळ तानाजी असवले खजिनदार उपाध्यक्ष मनोज जैन संचालक भूषण असवले ,पांडुरंग मोढवे, राज खांडभोर ,स्वामी जगताप, दत्ता गायकवाड, लक्ष्मण कुटे
कार्यक्रमाचे नियोजन प्रिन्सिपल राज कांबळे सर व व्हाईस प्रिन्सिपल प्रियांका कुडे व सर्व शिक्षक स्टाफ यांनी केलं . आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले यांनी केले.प्रस्ताविक संचालक राज खांडभोर यांनी केले व आभार रामदास वाडेकर यांनी व्यक्त केले.