रामदासस्वामी पादुकांचे आज निगडीत आगमन
पिंपरी:  श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड आयोजित समर्थ रामदासस्वामी पादुकांचा दौरा शुक्रवार, दिनांक ०८ डिसेंबर ते शनिवार, दिनांक १६ डिसेंबर २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. त्या अंतर्गत ज्ञानप्रबोधिनी, निगडी येथील मनोहर वाढोकर सभागृहात उद्या शुक्रवारी ठीक ४:०० वाजता स्वामींच्या पादुकांचे आगमन होत असून दिनांक १६ डिसेंबरपर्यंत भाविकांना पादुकादर्शनाचा लाभ घेता येईल. 
दिनांक ०९ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२३ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अनुक्रमे निगडी काचघर, संभाजीनगर, निगडी एल आय जी, पेठ क्रमांक २६, रावेत, यमुनानगर, आकुर्डी, सिद्धिविनायकनगरी या परिसरात सकाळी ८ ते १२ या वेळेत सांप्रदायिक भिक्षा फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज दुपारी ३:३० ते ४:३० या वेळेत अनुक्रमे वैदेही भजनी मंडळ, स्वरशारदा भजनी मंडळ, दत्त भजनी मंडळ, नवचैतन्य भजनी मंडळ, सरस्वती भजनी मंडळ, ज्ञानदीप उपासना मंडळ, स्वरशांती भक्ती मंडळ भजनसेवा रुजू करतील. दररोज सकाळी ६:०० वाजता काकड आरती, पादुकांची महापूजा आणि आरती तसेच सायंकाळी ७:१५ वाजता करुणाष्टके, सवाया, आरती आणि शेजारतीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय दररोज सायंकाळी ५:०० वाजता मकरंदबुवा करंबेळकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून रात्री ८:३० वाजता अजेयबुवा रामदासी यांचे आध्यात्मिक प्रवचन होईल.
सर्व भाविकांनी या आध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!