वडगाव मावळ:
इंचगिरी रसाळ सांप्रदाय वाढव ते आळंदी पायी दिंडीवारीचे येथे  स्वागत करण्यात आले.इंचगिरी रसाळ सांप्रदायचे संत समर्थ सद्गुगुरु श्री शंकर महाराज रसाळ यांच्या आशिर्वाद व परंपरेने चालत आसलेली दिंडी सोहळा अखंडपेणे गुरुवर्य सद्गुगुरु श्री पांडुरंग महाराज रसाळ गुरुभक्ताना आनंदवारी मिळून देतात.
व त्या निमित सर्व वारकरी यांना दर वर्षी प्रमाणे गेल्या वर्षी सर्व महीलाना साड्या व पुरुषाना कपडे कै भीमाबाई बबन कल्हाटकर यांच्या स्मरणार्थ,पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोशियन महाराष्ट्र राज्य व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मावळ अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या कडुन देण्यात आली होती.
यावेळी सर्व वारकरी मायबाप यांची सेवा म्हणुन प्रत्येक वारकऱ्याला ऊबदार ब्लेंकेट वाटपकरुन सेवा करण्यात आली यावेळी व मनोज गवारी व गणेश गवारी या कुटुंबाकडून सर्व वारकरी यांना नेहमी प्रमाणे महा प्रसाद करण्यात आला.
यावेळी उपस्तीत इंचगिरी रसाळ सांप्रदाय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री तुकाराम महाराज रसाळ , सरपंच एकनाथ शेटे ,अध्यक्ष मावळ चॅरिटेबल ट्रष्ट श्री बाळासाहेब थरकुडे ,श्री हभप बबन महाराज आगिवले,श्री नवनाथ कल्हाटकर,सरपंच सोपान काटकर,हभप रामचंद्र गुणाट,हभप खारमारे मामा,हभप गोरक्ष दौंडकर व हभप बबन महाराज कल्हाटकर यांनी सन्मान करून कार्यक्रमाची संगता व वारकरी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेछा देऊन स्वागत रामनाथ शेटे यांनी केले.

error: Content is protected !!