वडगाव मावळ:
माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि महावितरण विभागाच्या सहकार्याने घरकुल परिसरात ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे.गेल्या दहा दिवसांपूर्वी वडगाव नगरपंचायत हद्दीतील एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या भारत पेट्रोलियम पंपाजवळील घरकुल वसाहत व इतर भागाला विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरण विभागाच्या डिपीवरील ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी चोरला होता.
तब्बल दहा दिवसांपासून या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी घरकुल भागातील रहिवाशांनी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्याशी संपर्क साधून घडलेली सर्व माहिती कळविल्यानंतर त्वरीत ढोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता मनोज नेमाडे यांच्याशी संपर्क साधून नवीन ट्रान्सफॉर्मर येईपर्यंत तसेच क्रेन उपलब्ध करून देत ट्रान्सफॉर्मर बसविण्यापर्यंत विशेष प्रयत्न करण्यात आले.
दहा दिवसांपासून अंधारात असलेल्या या गोरगरीब वस्तीतील रहिवाशांनी आज लाईट आल्यानंतर मा नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी माजी.नगराध्यक्ष मयूर ढोरे, सहाय्यक अभियंता मनोज नेमाडे, वायरमन विपुल मराठे, विलास आगळमे, पुरुषोत्तम खाडे आणि नगराध्यक्ष यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे वेळोवेळी सहकार्य मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान