इंदोरी:
गणपती बाप्पा मोरया ऽऽऽऽ मंगलमूर्ती मोरया ऽऽऽऽ चा जयघोष येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) येथे घुमला. शाळेच्या प्रांगणात पारंपारिक वाद्यांचा गजर, लेझीमचा दणदणाट झाला. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या वरद विनायकाला अनंत चतुर्थीला निरोप दिला.शाळेने गणेशोत्सवा ची धूम अनुभवली.
चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित,चैतन्य इंटरनेशनल स्कूल (सीबीएसई) येथे गणेशोत्सव जल्लोषात साजरा झाला.
१९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर अवघ्या १० दिवस विभिन्न प्रकार चे कार्यक्रम आणि प्रतियोगिता आयोजित करण्यात आल्या.
रांगोळी, चित्रकला, गायन, वादन, सूर्यनमस्कार, मल्लखांब अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
नित्य प्रातः आरतीला विविध मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुलांनी लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप दिला.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर, संस्थेच्या सचिव राधिका मॅडम , कुमार सर, पार्वती मॅडम, त्यागराज शेवकर ,नलिनी माळी हे सदस्य उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष शेवकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन