
“मानव धर्म एकचि एक”*
“मानव जात सारी एक”*
“मानवी संस्कृती तीही एक”*
“मानवी मन तेही एक”*
“जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून फक्त दोनच जाती आहेत ,
त्या म्हणजे “सज्जन” व “दुर्जन”
“माणसाच्या निरनिराळ्या जाती” हा या देशातील एक भला मोठा यक्ष प्रश्न आहे.* जात हा प्रकार अनिष्ट आहे , त्याज्य आहे , टाकावू आहे असे सर्वच सर्वत्र सांगतात . परंतु प्रत्यक्षात मात्र ही जात नष्ट होण्याची काहीच चिंन्हे दिसत नाहीत . *”जी जात नाही ती जात”* असे म्हणण्याची पाळी आलेली आहे .
ही जात जात्यांत घालून तिचे पीठ केले तरी सुद्धा ती “भाकर” होऊन माणसाला आपला “चाकर” करील .* जात मोडण्याचा जे प्रयत्न करतात ते स्वतःच मोडले जातात पण ती मात्र ताठ उभी रहाते .
वास्तविक , ……..
जात या प्रकारामध्ये वाईट असे काही मुळातच नसते .* पोट भरण्यासाठी माणसे निरनिराळे व्यवसाय करीत असतात व त्या व्यवसायाच्या संंदर्भात ते त्या त्या जातीचे ठरत असतात.* उदा. तेली, तांबोळी, कोळी , सोनार , सुतार , शिक्षक वगैरे वगैरे .
वास्तविक , …..
या सर्व प्रकारात *”Division of Labour”* म्हणजेच *”श्रम विभागणी” अशी कल्पना आहे.*
हे सर्वच व्यवसाय समाजाच्या धारणेला आवश्यक असल्यामुळे त्यात “श्रेष्ठ-कनिष्ठ” असा प्रकार नसतो किंवा नसला पाहिजे.*
परंतु ……..
व्यवहारामध्ये मात्र हा विवेक पाळला जात नाही व त्यामुळेच ….. *माणसा-माणसांत उच्च-नीच भाव निर्माण होऊन त्यातून सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण होतात.* म्हणूनच जाती मोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा *जातीच्या संदर्भात माणसा-माणसांच्या मनात जी “उच्च-नीच” अशी विकृत मनोवृत्ती निर्माण होते ती मोडण्याचा प्रयत्न केला तरच इच्छित ध्येय प्राप्त करता येईल .*
शूद्र जन्माला येत नाहीत , तर जे*
*गुरूद्रोह , समाजद्रोह , व राष्ट्रद्रोह*
*करतात तेच खरे शूद्र होत.*
— *सद्गुरू श्री वामनराव पै*
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ




