पिंपरी:
चिखलीतील चंदनशिवे, दिघीतील गडकर आणि शिरगावातील गायकवाड टोळी या तीन संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील २२ सराईत गुन्हेगारांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई केली आहे.
चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख चंदू उर्फ ओंकार शहाजी चंदनशिवे रा. तळवडे, रामेश्वर धनराज कांबळे रा. निगडी, आदित्य गोरख दनुगहू रा. निगडी, गणेश परमेश्वर उबाळे रा. निगडी, विशाल शंकर वैरागे रा. निगडी, शुभम उर्फ विलन गजानन खवडे रा. रुपीनगर या आरोपींवर आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
दिघी पोलीस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख ऋषिकेश हनुमंत गडकर रा. आळंदी देवाची, भरत अण्णाराव मुळे रा. आळंदी देवाची, ओमकार नारायण गाडेकर रा. आळंदी देवाची, अर्जुन बाजीराव वाघमोडे रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी, अल्पवयीन मुलगा आणि त्यांचे तीन साथीदार यांच्या विरोधात एकूण सतरा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
शिरगाव परंडवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड रा. शिरगाव, ता. मावळ, संदीप उर्फ अण्णा छगन गोपाळे रा. शिरगाव, ता. मावळ, ऋत्विक शिवाजी गोपाळे रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ, अक्षय बबन ओहोळ (रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर,अमोल अप्पासाहेब गोपाळे रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ, निखील दिलीप बालवडकर रा. बाणेर, पुणे, सागर राहुल ओहोळ रा. बालेवाडी, पुणे. मूळ रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर संतोष उर्फ अमर प्रकाश ओझरकर (रा. माण, ता. मुळशी) यांच्या विरोधात पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
या तीनही टोळ्यांतील आरोपींनी संघटीत टोळी निर्माण करून वर्चस्व आणि दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत. या आरोपींवर चिखली, निगडी, तळेगाव एमआयडीसी, दिघी, आळंदी, भोसरी एमआयडीसी, येरवडा, शिरगाव परंडवाडी, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, चतुश्रुंगी पोलीस ठाण्यांमध्ये घातक शस्त्रे बाळगून त्याद्वारे दहशत आणि खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, दरोड्याची तयारी, खंडणी, जबरी चोरी, दुखापत, वाहनांची तोडफोड, चोरी, घरफोडी, जनतेची जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणणे, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगून खुनाचा कट करणे, खुनाचा पुरावा नष्ट करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दुखापत करणे, सरकारी कामत अडथळा आणून मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव पोलीस ठाणे स्तरावरून अपर पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आले. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी तीन टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम