लोणावळा:
कोथुर्णेतील घटनेने मावळ हादरलेल्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा एकदा नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची दुसरी घटना घडली.सोमवारी (दि. २५) सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास सदापुर (ता. मावळ) येथे ही निर्दयी घटना घडली.
घटनेतील नराधम आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय शशिकांत मालपोटे ( वय अंदाजे ३५, रा. उर्से ता. मावळ) याच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २५) रोजी सायंकाळी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास सदापूर (ता. मावळ) येथे आरोपी विजय मालपोटे याने माझी मुलगी (९ वर्षीय बालिका) हिला चॉकलेट देण्याच्या आमिषाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहे.

error: Content is protected !!