तळेगाव दाभाडे:
‘मेरी माटी मेरा देश’ या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना संलग्नित  उपक्रमामध्ये तळेगाव दाभाडे येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींनी आपापल्या गावांमधून आणलेल्या मातीचे अमृत कलशात संकलन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ यांच्या हस्ते कलशपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. माधुरी चंदनशिव, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!