पुणे:
    पुण्यातील सुमती बलवान शाळेतील बालवाडी ते दहावी पर्यंतचे ८०० विद्यार्थी प्लास्टिक मुक्त झाले.टेलस ऑर्गानायझेशन संस्थेच्या माध्यमातून  हा उपक्रम राबविण्यात आला.
     स्व. नंदिनी नाईक, टेलस संस्थेच्या स्व. राजश्री कडू आणि सुमती बालवन शाळेचे शिक्षक  नितीन घोले  यांच्या स्मरणार्थ  कात्रज भागातील गुजर निंबाळकरवाडी येथील सुमती बालवन शाळेतील बालवाडी ते दहावीच्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना स्टीलच्या बाटल्यांचे वाटप करून संपूर्ण शाळा  ‘प्लास्टिक बाटल्या मुक्त’ करण्याचे मोठे आव्हानात्मक काम केले.
        गेले अनेक वर्षात पुण्यातील विविध शाळेत संस्थेने आजवर शेकडो स्टील बाटल्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांना प्लास्टिक पासून  परावृत्त करण्याचे काम केले असून. या वेळी सुमती बालवन ही संपूर्ण शाळाच प्लास्टिक बाटली मुक्त केली गेली.  टेलस ऑर्गनायझेशन  संस्थेचे लोकेश बापट यांनी पुढाकार घेत या उपक्रमाचे आयोजन केले होते.
         एक संपूर्ण शाळा प्लास्टिक बाटली मुक्त करायचे  आणि समाजात एक चांगला संदेश यानिमित्ताने पोचवायचा प्लास्टिक प्रदूषण पासून युवा पिढीला दुष्परिणाम भोगावे लागू नये व त्यांनी प्लास्टिक वस्तूंना उपलब्ध पर्याय निवडून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक जीवन शैली अंगीकारावी अशी या मागची भूमिका होती.
या संबंधी शाळेच्या संस्थापीका  मानसी देशपांडे यांच्याशी अनेक दिवस चर्चा चालू होती. त्यांनाही ही कल्पना आवडली. सुमती बलवान शाळेतील जवळपास सत्तर टक्के मुले स्टील डब्यांच्या वापर करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या उपक्रमात गौरी परुळकर आणि स्वानंद महिला संस्थेच्या रंजना लोढा यांनी सहभाग घेऊन मोलाची मदत केली. 
    या उपक्रमात टेलस ऑर्गनायझेशन चे लोकेश बापट, विश्वास घावटे, राजन कुबेर, सतेज पाषाणकर, अनिता पाषाणकर, जान्हवी बापट, मंजुश्री  घावटे, रमणीक सोलंकी  तसेच शाळेच्या संस्थापक मानसीताई देशपांडे, मुख्याध्यापक सोनाली बगाडे व  शिक्षिका कस्तुरी मधाले, वर्षा फाटक, स्वाती जाधव यांच्या हस्ते आज शाळे मधील सर्व  विद्यार्थ्यांना स्टील बाटल्यांचे वाटप  करण्यात आले.

error: Content is protected !!