चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत   तृतीय क्रमांक
इंदोरी:
   सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल सुदूंबरे या ठिकाणी आयोजित केलेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल (CBSE), इन्दोरी या  स्कूलच्या 17 वयोगटाखालील मुले व 14 वर्षाखालील मुली, या  विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

सर्व खेळाडू आपले कौशल्य पणाला लावून खेळले व हे यश खेचून आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या प्रसंगी  संस्थेचे चेअरमन श्री भगवान शेवकर सर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक श्री वेद सर व प्रियंका मोरे आणि माधुरी मॅम यांचे विशेष  कौतुक केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की ‘खेळ हा विद्यार्थ्याला संघटन ,परस्पर साहचर्य, निकोप खिलाडी वृत्ती शिकवतो. खेळ हा खिलाडी वृत्तीने  खेळला पाहिजे हा संस्कार चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यावर सातत्याने रुजवला जातो व भविष्यातही रुजवला जाईल’ असा सार्थ विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!