रोटरी क्लब ऑफ मावळ  व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या वतीने नागपंचमी निमित्त सर्पांविषयी व्याख्यान
कामशेत:
रोटरी क्लब ऑफ मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या वतीने नागपंचमीच्या औचित्य साधून सर्पाविषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या व्याख्यानात विद्यार्थ्यांना मावळ व देशभरातील विविध सर्पांच्या प्रजाती विषयी स्लाईडच्या माध्यमातून विषारी,निमविषारी, बिनविषारी सर्पांच्याविषयी तसेच त्यांचे भक्ष सर्पदंश उपाय व खबरदारी,सर्पदंशावर लसीकरण सर्पांविषयीच्या अंधश्रद्धा,सर्प अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

तळेगाव दाभाडे येथील अण्णासाहेब चौबे (बाल विकास)हायस्कूल व कामशेत येथील महर्षी कर्वे निवासी आश्रम शाळेत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यानी व्याख्यानाचा लाभ घेत अनेक प्रश्न विचारले.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद जिगर सोलंकी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले.याप्रसंगी दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्रा.डॉ.गौरव बरहोदिया उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष सुनील पवार, सेक्रेटरी रेश्मा फडतरे प्रकल्प प्रमुख रूपेश चव्हाण,पूनम देसाई ,विशाल चव्हाण वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे ,अध्यक्ष अनिल आंद्रे,किरण मोकाशी,जिगर सोलंकी,भास्कर माळी, गणेश गायकवाड,अनिश गराडे,विकी दौंडकर उपस्थित होते.

अण्णासाहेब चौबे (बाल विकास)हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे व महर्षी कर्वे निवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता देवरे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!