कान्हेच्या साईबाबा सेवाधाम येथे गरजू विद्यार्थाना मदतीचा हात
वडगाव मावळ:
कान्हे ता.मावळ येथील साईबाबा सेवाधाम ट्रस्ट येथे मावळ तालुक्यातील गरजू विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आहे.दरवर्षा प्रमाणे याही वर्षी मदतीचा हा हात देत साईबाबा सेवाधाम ट्रस्टने अपली परंपरा जपली.गुरु पौर्णिमेनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेच्या साई मंदिरात हा सोहळा संपन्न झाला.दरवर्षी प्रमाणे मुंबईच्या जॅन्ट्स ग्रुप ऑफ चौपाटी यांनी ही मदत दिली.यात अजित फाउंडेशन तर्फे दहा आदिवासी विद्यार्थ्यांना बॅग व शालेय साहित्याचे किट देण्यात आले .सहा शाळेतील १२० विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्ष पुरेल इतके साहित्य देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जॅन्टस ग्रुप ऑफ चौपाटीच्या सदस्य र्शमी शहा , किशोरी बेन जव्हेरी, अमिता धारिया ,निशा मुजूमदार , माजी अध्यक्षा प्रिती शहा उपस्थित होत्या.या प्रसंगी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. साईबाबा सेवाधाम विद्यार्थी मित्र मंडळाच्या सहकार्यामुळेच मी शिक्षक होण्याचे उद्दिष्ट गाठू शकलो अशी आठवण मधुकर दळवी शिक्षकाने सांगितली.
र्शमी शहा म्हणाल्या,” साई बाबा सेवाधामशी अनेक वर्षांचा आमचा स्नेह आहे.हा स्नेह दिवसागणिक अधिक दृढ होत आहे. यापुढे देखील गरजू व होतकरू विद्यार्थाना मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.डॉ.स्वाती वेदक यांनी संस्थेच्या विद्यार्थी मित्र मंडळाच्या उपक्रमाविषयी माहिती देऊन या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीबद्दल उपस्थितांना माहिती करून दिली
.ह.भ.प. दत्तात्रय हजारे यांनी जॅन्ट्स ग्रुप ऑफ चौपाटीचे आभार मानले.विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी दत्तात्रय चांदगुडे, विशाल वाघमारे ,ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज खर्चे ,महेंद्र पाटील, भाऊसाहेब भुंडे ,रोहन अंगारखे व सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
तेहमीना बार्मा सेंटर नायगाव. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरवडे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथुर्णे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकसई, नाणे माध्यमिक विद्यालय नाणे,वरसुबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव येथील विद्यार्थाना ही मदत देण्यात आली.
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा