पुणे:
टेलस संस्थेच्या वतीने मुळशी तालुक्यामधील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या आसदे गावातील ४० विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला.
वस्तीगृहाला टेलस ऑर्गनायझेशन संस्थेने साखर, गहू, तांदूळ ,मसूर डाळ, पीठ व इतर वस्तू आणि धान्य वाटप केले. शाळेच्या वस्तीगृहामध्ये मुळशी तालुक्यामधील अनेक दूरवरच्या सह्याद्रीच्या डोंगररांगेतून तसेच बाहेरच्या खेड्यापाड्यातील अनेक गरीब, वंचित, होतकरू अशी धनगर, कातकरी, गवळी, आदिवासी समाजातील गरीब विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत.
टेलस संस्थेच्या लोकेश बापट यांनी या संबंधात माहिती घेत पुढाकार घेऊन या उपक्रमाची आखणी केली होती. याप्रसंगी टेलस संस्थेच्या आशिष देशपांडे व सुप्रिया देशपांडे या दांपत्याने गरीब विद्यार्थ्यांच्या वस्तीगृह करता धान्याची व्यवस्था करीत सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी टेलस संस्थेचे लोकेश बापट, राजन कुबेर, आशिष देशपांडे, सुप्रिया देशपांडे तसेच स्वामी विवेकानंद विद्यालयाचे श्री अनिल व्यास, मुख्याध्यापक श्री सतीश शिंदे, आय बी टी प्रमुख श्री वसंत बोराडे, वस्ती गृहाचे सुवर्णा फाले यांचा सर्वांचे यावेळी मोठे सहकार्य लावले.