वडगाव मावळ:
यशवंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी विजय उभे यांची निवड झाली,मावळते अध्यक्ष सचिन आवटे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.

अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विजय उभे  यांचा एकमेव अर्ज आल्याने उभे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी यशवंत पतसंस्थेचे संस्थापक भाऊसाहेब आगळमे, संचालक नामदेव गाभणे,मारूती आगळमे,विजय शिंदे, भरत आगळमे, संचालिका लक्ष्मीबाई आगळमे,व्यवस्थापिका सुलभा गावडे, दत्तात्रय मोहिते, भारत काळे उपस्थित होते.

वडगाव मावळ येथील उद्योजक व शिवराज ग्रुपचे सर्वेसर्वा अतुल वायकर यांच्या वतीने हाॅटेल शिवराज येथे उभे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महेश नखाते,संजय आंबेकर,विकास सातकर,साहेबराव नखाते, गोरख असवले,संकेत जगताप उपस्थित होते.

error: Content is protected !!