

तळेगाव दाभाडे:
येथील श्री.सद्गुरु सेवा मंडळाच्या वतीने आदिक मासानिमित श्री.स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा एक कोटी पंचवीस लाख जप संकल्पाची सांगता रविवार ता. १३ला होणार आहे.मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या प्लोरा सिटीतील खांडगे निवास येथे सांगता होणार आहे,या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ७ वाजता लघुरुद्र व विष्णुसहस्रनामाने होणार आहे. यावेळी नारायण भिकाजी भाटे, गुरुवर्य धारकर ताई, कॅप्टन अतुल इंदुलकर महाराज, पौर्णिमा ताई,. डॉ. भरत बल्लावली उपस्थित राहणार आहे. सायंकाळी चार वाजता योगेश तपस्वी यांचा गीत गुंजन हा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सायंकाळी पाच वाजता’ श्री स्वामी समर्थ’ सिरीयल मधील स्वामींची भूमिका करणारे अक्षय मुडावदकर उपस्थित राहणार आहे.
सद्गुरु सेवा मंडळाची पालखी सेवा मंडळाचे सभासद सादर करणार आहेत. महाआरती व महाप्रसाद होणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष परेश कुलकर्णी व मुख्य आयोजक गणेश वसंतराव खांडगे यांनी दिली.
- आढले खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेंद्र भोईर बिनविरोध
- मावळात राष्ट्रवादीच्या ‘गौरव महाराष्ट्र रथयात्रेचे जल्लोषात स्वागत
- उपेक्षित कामगारांच्या स्वेदगंगेचा सन्मान झाला पाहिजे!’ – प्रा. डाॅ. राजा दीक्षित
- मराठी भाषा आंदोलक म्हणून राजन लाखे यांचा सत्कार
- भारत सरकारच्या आयुष मंत्रालय “योग प्रमाणी करण मंडळाच्या “योग तज्ञ” पदी कैवल्यधाम योग संस्थेचे सुबोध तिवारी यांची नियुक्ती



