मुंबई :
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली.वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाच्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भन्नाट किस्सा सांगितला.
अजित पवार गट शिवसेना-भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. यापूर्वी विरोधीपक्ष नेते अजित पवार होते. अजित पवार यांनी ३० जून रोजी या पदाचा राजीनामा दिला आणि २ जुलै रोजी सरकारमध्ये सहभागी झाले.
वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. अजित पवार हे विजय वडेट्टीवार यांना आसनापर्यंत घेऊन गेले.विरोधी पक्षनेतेपदासाठी घेऊन जात असताना सभागृहात दोन्ही बाजूंनी जोरदार हशा पिकला. खरे तर काही काळापूर्वी ते स्वतः या पदावर होते आणि आता ते सरकारसोबत बसले आहेत. यावेळी सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एक भन्नाट किस्सा सांगितला. एक कठीण पोटनिवडणूक होती. विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या कर्तृत्वाने अनेक संधी मिळाली. विधानपरिषदेत, फॉरेन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये त्यांनी काम केले. प्रत्येक संधीचा त्यांनी समाजाकरीता आणि पक्ष वाढवण्याकरीता फायदा केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेमध्ये विदर्भातील प्रमुख नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाहल्या जायचे. ज्यावेळी राणे साहेबांनी त्या काळात शिवसेना सोडली. राणे यांना साथ देणारे विजयभाऊ देखील होते. त्यावेळी कठीण अशाप्रकारची निवडणूक होती. पोटनिवडणूक होती. त्या पोटनिवडणुकीत विजय भाऊंना पाडण्यासाठी आम्ही सगळे गेलो होतो. कारण ते नुकतेच शिवसेना सोडून काँग्रेसकडून उभे राहिले होते. आम्हाला युतीमध्ये त्यांना पराजीत करायचे होते.
पण त्यावेळी मी बघितलं की त्यांचा संपर्क दांडगा होता. त्या पोटनिवडणुकीत ते निवडून आले. त्यानंतर सातत्याने ते निवडून आले. २०१४ मध्ये त्यांनी चिमूरच्या ऐवजी ब्रम्हपूरी मतदारसंघ निवडला. वेळेवर त्यांनी हा मतदारसंघ निवडला होता. ब्रम्हपूरी सारख्या मतदार संघात पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी देखील विजय मिळवला. त्यांचा संपर्क केवळ एका मतदारसंघापूर्ता मर्यादीत नाही हे त्यांनी दाखवून दिले.
२०१० मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी विविध खात्याचे राज्यमंत्रीपद देखील वडेट्टीवार यांच्याकडे होते. २०१४ च्या शेवटच्या टप्प्यात विखे पाटील विरोधीपक्षनेते म्हणून आमच्याकडे आले. त्यावेळी आपण विरोधीपक्षनेता झाला. त्यावेळी देखील तुम्ही तुमची छाप पाडली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस