मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने ग्रामीण भागात संगणक वाटप
वडगाव मावळ:
मावळ तालुका युवक काँग्रेसच्या पुढाकारातून पाचाणे,ओव्हळे आणि बेडसे येथील शाळांना संगणकाचे वाटप करण्यात आले. मावळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.सारक्षता ते संगणक नीती ते इंटरनेट या थीमवर आधारित ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची बोट ही संगणकाच्या की पॅड वरून फिरली पाहिजे या हेतूने या संगणकाचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे,मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यशवंत मोहोळ ,मावळ तालुका विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष पवन गायकवाड, पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रोहिदास वाळुंज, संदीप  बुटाला, सरपंच खंडू येवले , उद्योजक स्वप्निल  सावंत,  सोमनाथ  इंगळे ,  पाचाणेचे  सरपंच खंडू येवले,  सरपंच सुभाष येवले,माजी सरपंच अश्विनी सुभाष येवले,  पै. स्वप्नील  सावंत,  समीर येवले,  विनोद पवार उपस्थित होते.

  देशाच्या संगणक क्रांतीचे जनक तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील बहुसंख्य शाळांना संगणक संच भेट देण्याचा संकल्प मावळ युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला असल्याची माहिती युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांनी दिली.
 
संगणक संच  भेट  मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. ज्ञानदानाच्या या पवित्र कामात आम्ही काँग्रेसजण सहभागी असल्याने आम्ही समाधानी आहोत अशा भावना काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्या. तालुका युवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर राजेश वाघोले यांनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून पक्ष संघटनेचा विचार तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी कंबर कसल्याचे गौरवोद्गार काँग्रेस नेत्यांनी काढले.

युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले म्हणाले,”विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत मैदानी खेळ,व्यायामाची गरज आहे. तशी बदलत्या काळाची पावले ओळखून संगणक ज्ञानही गरजेचे बनले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञानाची प्राथमिक ओळख व्हावी ही अपेक्षा आहे.

error: Content is protected !!