वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील स्थानिक भूमीपुत्र व तरूणांना रोजगार उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मावळचे आमदार सुनिल शेळके व तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या शिष्टमंडळाने आमदार सुनिल शेळके व तहसीलदार देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

मावळ तालुक्यातील स्थानिक तरूण ,तरूणी आणि भूमीपुत्रांना मावळ तालुक्यातील कारखानदारी,उद्योग व व्यवसायात रोजगारासाठी प्राधान्य देण्यात यावे.

मावळ तालुक्याचे राज्य आणि देशाच्या विकासात मोठे योगदान आहे.पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीसाठी स्वातंत्र्य पूर्व काळात मावळ तालुक्यात धरणे झाली आहे. स्वातंत्र्य नंतर औद्योगिकरण,शेती,पिंपरी चिंचवड शहर आणि तीर्थस्थळांच्या पिण्याच्या पाण्यसाठी अनेक धरणे बांधली आहे.रेल्वे मार्ग,महामार्ग,द्रुतगती महामार्गासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या आहे.

सरंक्षण खाते,सीआरपीएफ,औद्योगिक वसाहत,अनेक सामाजिक संस्था,शैक्षणिक हब,फुल उत्पादनासाठी मावळ तालुक्यातील शेतक-यांनी आपल्या जमिनी दिल्या आहे. मावळ तालुका औद्योगिकरणाने जगाच्या नकाशावर पोहचला आहे. लोणावळा खंडाळयातील हाॅटेल व्यवसायाला सुगीचे दिवस आहे. मावळ तालुक्यात रोजगाराच्या अनेक संधी आणि सुविधा उपलब्ध असताना स्थानिकांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचे आमचे निरीक्षण आहे.

आपणांस विनंती करण्यात येत आहे,तळेगाव दाभाडे,टाकवे बुद्रुक,उर्से,लोणावळा तील औद्योगिकीकरणात स्थानिकांना रोजगारात ५० टक्के संधी मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. तसेच लोणावळा खंडाळयातील हाॅटेल व्यवसाय, तालुक्यातील फाॅर्म हाऊसेस येथेही स्थानिकांना आपल्या कुवतीनुसार काम मिळावे.

आंदर मावळातील वहानगाव येथे सुमारे पाचशे कोटींची गुंतवणूक असलेल्या महर्षी वैदिक प्रा.लिमिटेडच्या आयुर्वेदिकाशी संबंधित असलेल्या प्रकल्पा सह तालुक्यात अनेक ठिकाणी या सारखे अनेक लहान मोठे प्रकल्प आहे. गहुंजे येथील स्टेडियम,पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर असलेल्या सेवा अशा कामातही स्थानिकांना प्राधान्य द्यावे.

आमदार सुनिल शेळके म्हणाले,” पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उद्योग व कामगार मंत्री यांच्याकडे उपस्थित सरकार दरबारी ठाम पणे मांडणार आहे.या बाबत धोरण ठरवले अशी आमची मागणी असेल.

error: Content is protected !!