देह म्हणजे देवाचा पोशाख
मानवी शरीर हे मानव प्राण्याला मिळालेले एक उत्कृष्ट वरदान आहे. पंचमहाभूते, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही अंतरेंद्रिये, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, संकल्पशक्ती, विचारशक्ती वगैरे सर्व देणग्यांनी युक्त असे हे मानवी शरीर म्हणजे प्रत्यक्षात निसर्ग देवतेचा एक विलक्षण चमत्कार आहे.
इतर सर्व प्राण्यांची शरीरे जमिनीला समांतर असतात तर मानवी शरीर हे एकच शरीर असे आहे की ते जमिनीला सरळ उभे (Perpendicular) असते. मानवी शरीराच्याद्वारे मानवप्राण्याला वरील ज्या देणग्या प्राप्त झालेल्या आहेत, त्यांचा योग्य तो उपयोग केल्याने माणूस थेट परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचू शकतो.परंतु या देणग्यांचा दुरूपयोग केल्यास तो अत्यंत हीन पशूच्या पातळीपर्यंत अध:पतित होऊ शकतो.
*देहाशी संलग्न अवस्थेत ओम होतो अहं, तर देवाशी योग अवस्थेत ओम होतो सोहं.*
*देहाच्या ‘अंगाने’ जग हे नश्वर भासते, तर स्वरूपाच्या अंगाने तेच जग ईश्वर दिसते.*
*देहाच्या अंगाने आराम हराम आहे तर स्वरूपाच्या अंगाने आराम हा राम आहे.*
*देह म्हणजे देवाचा पोशाख.*
*देह ही देवाची धनाने भरलेली कुलूपबंद पेटी. या पेटीची किल्ली म्हणजे भगवन्नाम.*
*देह हा गुलाब आहे व त्यातील सुगंध हा गोविद आहे.*
*
सद्गुरू श्री वामनराव पै
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन