चातुर्मासात लोक नाना प्रकारची व्रत करीत असतात. कोण कांदा सोडतो तर कोण लसूण सोडतो, कोण चहा सोडतो तर कोण मांसाहार सोडतात. याच्या उलट काही लोक शंकराला बेल वहातात तर दुसरे काही लोक गणपतीला दुर्वा वाहतात, तर काही लोक अनवाणी भर दुपारी देवदर्शन करतात. अशा रितीने चातुर्मासात लोकांची धरसोड चाललेली असते.

वास्तविक, जे धरायला पाहिजे ते सोडतात व जे सोडायला पाहिजे ते घरतात, असा लोकांचा विचित्र प्रकार चाललेला असतो.अशा प्रकारची व्रते करून मनाचा वात्यपणा कमी झाल्याचे दिसत नाही, उलट अशा प्रकारची व्रते करून अहंकार मात्र फुगलेला दिसून येतो. अशा प्रकारची व्रत करण्यापेक्षा जीवनविद्या प्रणित व्रते करणे अधिक हितकारक व उपकारक ठरतील.

“लोकांचे भले व्हावे कल्याण व्हावे, असे चिंतन करणे” हे व्रत खरे.

“सर्व लोक सुखात व आनंदात असावेत असे मनापासून इच्छिणे व तशी
नित्य प्रार्थना करीत राहणे”, यालाचा खरे व्रत असे म्हणतात.

“लोकांशी नित्य शुभ बोलणे व त्यांच्या गुणांची वाखाणणी व प्रशंसा करणे” हे खरे व्रत होय.

” जमेल तितके लोकांना सहकार्य व मदत करणे, हे सर्वात श्रेष्ठ व्रत होय.

चातुर्मासात लोक नाना प्रकारची व्रते करतात, परंतु ‘मी कोणाचेही मन दुखविणार नाही’ असा निश्चय करून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे. हे सर्वश्रेष्ठ व्रत होय.

सद्गुरू श्री वामनराव पै.

error: Content is protected !!