वडगाव मावळ: काँग्रेस पक्षाची पाळेमुळे तालुक्यात रुजवण्यासाठी युवक काँग्रेस पुढाकार घेणार असल्याचा विश्वास युवक अध्यक्ष पै.राजेश वाघोले यांनी व्यक्त केला. युवक काँग्रेस च्या पक्ष संघटनात्मक कामाबाबत ‘मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन ‘शी बोलताना वाघोले यांनी हा विश्वास व्यक्त केला.
राज्याच्या सत्ताकारणात झालेल्या फेरबदलानंतर सगळेच राजकीय पक्ष अॅक्शन मोड आले आहे. त्याच धर्तीवर मावळ युवक काँग्रेस पक्ष अॅक्शन मोड असल्याचे चित्र आहे. मावळ तालुका युवकचे अध्यक्ष राजेश वाघोले यांनी पक्ष संघटना बळकटीवर भर दिला.युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वाघोले यांची निवड झाल्यानंतर त्यांनी शहरी व ग्रामीण भागात पक्षविस्तारावर भर दिला आहे.
शहरी व ग्रामीण भागातील पक्ष कार्यकर्त्याच्या निवडी जाहीर करून वाघोले यांनी तरूण फळी उभी करण्याचे काम हाती घेतले आहे. देहूरोड,तळेगाव आणि मावळातील युवक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून नवसंजीवनी देण्याचे काम युवक संघटनेत दिसून येतेय. युवकांचे नेते, तरुण तडफदार कार्यकर्ते पक्ष संघटनेत काम करतील अशी व्यूहरचना युवक काँग्रेस मध्ये होत आहे.उद्योजक रामदास काकडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या बद्दल युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
मावळ तालुका युवक विधानसभेचे अध्यक्ष वाघोले अत्यंत जोमाने आणि प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचे विचार पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याच अनुषंगाने
त्यांना यश येत आहे. काँग्रेस पक्षाकडे अनेक युवकांचे प्रवेश होत आहे.तालुक्यात काँग्रेसची चर्चा होऊ लागली आहे. येत्या काळात काँग्रेस पक्षाला तळागळातत पोहचवण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे वाघोले यांनी सांगितले. मावळ तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी पवन गायकवाड यांची निवड करण्यात आली. आमदार संग्राम थोपटे
युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश टापरे , जिल्हाध्यक्ष विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत गोरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले यांच्या हस्ते गायकवाड यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
मावळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले म्हणाले,”
‘ गाव तिथे काँग्रेस आणि घर तिथे झेंडा’ हा उपक्रम हाती घेणार असून गावोगावी पक्ष संघटनेच्या शाखा स्थापन करण्यात येणार आहे. त्याच बरोबर सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर जन अंदोलन घेतले जाईल.