सद्गुरू व त्यांचे दिव्य मार्गदर्शन
*उफराट्या दृष्टीने घेतलेले नाम*
*ते जाणावे उफराटे नाम;”*
वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला तो याच उफराट्या नामाने व संत कबीर सांगतात, ..
*वो नाम कुछ और”* ते और नाम हेच ते उफराटे नाम होय .
परमार्थात बहुसंख्य साधक हे घेतात फक्त साधे नाम , त्यांना *और नाम अशा दिव्य नामाचा प्रकारच ठाऊक नसतो.* अशा लोकांना उद्देशूनच एके ठिकाणी
संत एकनाथ महाराज सांगतात ,
*जग राम राम म्हणे। तया कां न येती विमाने।।*
*नवल स्मरणाची ठेव। नामी नाही अनुभव।।*
➡️ और नाम म्हणजे साधे नाम किंवा गुप्त मंत्र नव्हे . मंत्रगुरू व सद्गुरू यांत भूवैकुंठाइतके अंतर आहे . मंत्रगुरू फक्त नाम किंवा मंत्र देतांत . सद्गुरू प्रत्यक्ष *”सद् वस्तूच”* हातांत देताता . सद्गुरूंनी एकदा का हातांत सद् वस्तू दिली की नुसते स्मरण करण्याचाच अवकाश *प्रत्यक्ष देवाचे (देवाच्या मुर्तीचे नव्हे) दर्शन घडू लागते , त्याचे रूप-स्वरूप अंतःचक्षुसमोर स्पष्ट तरळू लागते,* मग या साधकाच्या मुखातून उद्गार निघतात,
*रूप पहातां लोचनी ।*
*सुख झाले वो साजणी ।।*
*सर्व सुखाचे आगर ।*
*बाप रखुमा देवीवर ।।* किंवा
*तो हा श्रीहरि पाहिला डोळे भरी ।*
*पहातां पहाणे दूर सारोनिया ।।*
पहातां पहातां पहाणेच दूर सारून श्रीहरिला डोळे भरून कसे पहावयाचे हे फक्त सद्गुरूच शिकवू शकतात . किंबहुना हे शिकवितात ते खरे सद्गुरू होत. *सद्गुरूकृपेने एकदा का देवदर्शन झाले की देव सत्साधकाच्या स्मरणात इतका रूतून बसतो की त्याने स्मरण न करताही देवाचे स्मरण अखंड घडू लागते.*
*या अवस्थेतील साधक जगतो ते केवळ देवासाठीच . पण संसारात असतो इतर चारचौघांच्या सारखाच.*
*ते चालते ज्ञानाचे बिंब ।*
*अवयव ते सुखाचे कोंब ।*
*येर माणूसपण भांब । लौकिक भागु ।।*
अशा अवस्थेत तो संसारात नांदत असतो.
*– सद्गुरू श्री वामनराव पै*
(संदर्भ ग्रंथ – अमृत मंथन/वो नाम कुछ और)
*✍️ स. प्र. (sp)296*
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन