पवना शिक्षण संकुलातील नवीन विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक
पवनानगर :
आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शासनाने परिपत्रक काढून मराठी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्याच्या सूचना देण्यात आले होते.
पवना विद्या मंदिर,लायन शांता मानेक ज्युनियर कॉलेज तसेच कै. सौ. मिराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील सर्व नविन विद्यार्थांंचे आज ढोल ताशा लेझिमच्या गजरात बैलगाडीत बसवून पवनानगर चौकतून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.
तसेच विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण करत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले
यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे, काले पवनानगर ग्रामपंचायतीचे सरपंच खंडू कालेकर, उपसरपंच उत्तम चव्हाण, शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर,माजी विद्यार्थींनी व नव्याने पोलिस खात्यात दाखल झालेली पोलिस अधिकारी रंजना शिंदे व संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका निला केसकर, पालक विजय शिदे,पांडुरंग ठुले,बबनराव घरदाळे, विजय लोहर, बाळासाहेब ठाकर,दिलीप बोडके,अरुण कालेकर, यांंच्यासह संकुलातील सर्व विभागाचे प्रमुख व सर्व अध्यापकांच्या हस्ते नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांंना पुस्तके वाटप करण्यात आली.
तसेच इयत्ता दहावी व बारावीतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त गुणवंताचा सत्कार करण्यात आला. पवना ज्युनियर कलेजची माजी विद्यार्थींनी पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या रंजना शिंदे यांंचा विशेष सन्मान करण्यात आला.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस