तळेगाव दाभाडे:
नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयात या  शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

विविध नाविण्यपूर्ण कल्पनांसह शाळेमध्ये नव्याने प्रविष्ट झालेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांचा नवीन समर्थ विद्यालय या शाळेतील पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रत्येक क्षेत्रामध्ये शाळेचे घवघवीत यश ,शंभर टक्के निकालाची परंपरा, कुशल अध्यापक वर्ग ,सहशालेय उपक्रम, क्रीडा स्पर्धा ,शासकीय बौद्धिक स्पर्धा परीक्षांची वर्षभर तयारी, शासकीय रेखाकला परीक्षेचे मुख्य केंद्र इत्यादी वैशिष्ट्यांमुळे शाळेचा नावलौकिक मावळ तालुक्याच्या पंचक्रोशीत वाढत आहे.

पाल्याच्या प्रवेशासाठी नवीन समर्थ विद्यालयास पालक प्राधान्य देत आहेत.त्यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या लक्षणीय वाढलेली आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुग्यांची आकर्षक सजावट ,फुलांची रांगोळी, इत्यादी स्वरूपात शाळापूर्व तयारी करण्यात आली .नवीन विद्यालयातील शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी इयत्ता पाचवीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करून हाताचे ठसे विविध रंगांचा वापर करून कागदावर उमटविण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला .शालेय परिपाठाने नवीन शैक्षणिक वर्षाचा श्री गणेशा झाला .विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारी मोफत शालेय पाठ्यपुस्तके  देण्यात आली .

विद्यालयाचे प्राचार्य संजय वंजारे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.  शालेय समिती अध्यक्ष महेश शहा, विद्यालयाचे प्राचार्य  संजय वंजारे ,पर्यवेक्षक  रेवाप्पा शितोळे उपस्थित होते.

विद्यालयातील सर्व अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे यांनी केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव  संतोष खांडगे, खजिनदार  राजेशजी म्हस्के, सहसचिव  नंदकुमार शेलार ,नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे पालक रामदास काकडे यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्राचार्य, पर्यवेक्षक सर्व विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!