आपणच आपले भाग्यविधाते….एक समर्पक चिंतन….
मित्रांनो,
जे आपल्या नशिबात लिहिलं असेल तेच होईल असं अनेकदा कानावर घरची अथवा आजूबाजूची माणसं किंवा कधीतरी साधुसंत वगैरे मंडळी देखील असं कधीतरी बोलून जातात. नियती असेल ,नशीब असेल ,वगैरे वगैरे शब्द वेगळे असतील.
परंतु ही जी मंडळी आहेत ती आपण कधीच पाहिलेली नसतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कल्पनांच्या ही पलीकडे नक्कीच असतात .म्हणून आपण आज त्यांचाच विचार करणार आहोत. मित्रांनो, मी जसा जसा या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मला वाटायला लागलं की काही गोष्टी आपण स्वतः करू शकतो.
आपल्या भाग्याचे लेखक निर्माते आपणच होऊ शकतो. तस जर आपल्याला व्हायचं असेल तर तीन गोष्टी निश्चितपणे आपण लक्षात घ्यायला हव्यात .त्या म्हणजे प्रथम आपल्या मनात आलेला विचार हा त्यानंतर शब्दात व्यक्त केलेला उच्चार असतो.आणि शेवटी आपल्या आचरणात प्रत्यक्ष तो प्रगटतो.
आणि म्हणून मित्रांनो मला वाटतं या तीनही गोष्टी अशा असतात की ज्या आपण आपल्या मनावर केलेल्या संस्कारावर अवलंबून असतात त्यामुळे आपलं प्रत्येकाच स्वतंत्र भाग्य आपणच लिहीत असतो यावर कोणाचही दुमत होण्याच कारण नाही.
कारण आपल्या हातून जी कृती घडते ती आपल्या विचाराशिवाय घडूच शकत नाही त्यामुळे ह्या कृतीची म्हणजेच कर्माची चांगली किंवा वाईट फळ आपल्यालाच स्वीकारावी लागतात .आणि अशावेळी आपल कर्म वाईट असेल तर आपल्याला मिळणार फळ नक्कीच वाईट असेल अशावेळी तो आपल्या नशिबाला दोष देऊन मोकळा होतो.
म्हणून मित्रांनो खरं सांगू की यावेळी आपल्याला आपल्याच आत्मपरीक्षणाची खरी गरज आहे शेवटी आपलं भाग्य नक्की कोण लिहितं याचं उत्तर आपल्याला मिळालेल आहे म्हणून मित्रांनो मी आज इथेच थांबतो.
(शब्दांकन- ला. डॉ. शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन