वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त भटक्या विमुक्त जात जमाती सेलच्या वतीने तालुका स्तरीय भटक्या विमुक्त जात जमाती सेलच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा शिरगाव शिर्डी येथे उत्साहात संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती संभाजी शिंदे ,उपसभापती नामदेव शेलार, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष नारायण ठाकर, दत्ता पडवळ , संदिप आंद्रे ,संतोष मुर्हे, नितीन मुर्हे , संभाजी राक्षे अॅड जगन्नाथ गोपाळे, भानुदास गोपाळे , विजय गोपाळे , दत्तात्रेय वाघमारे, नथु वाघमारे , मोहन अवघडे, स्वप्निल अरगडे ,विलास गोपाळे, प्रा. संतोष गोपाळे उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” गोरगरीब,दुर्बल घटक तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती साठी असलेल्या योजना त्याच्यापर्यत पर्यत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.
या कायॅक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भटक्या विमुक्त जात जमाती सेलच्या अध्यक्ष नथु वाघमारे यांनी केले होते .रामदास मदने यांनी स्वागत केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष गोपाळे यांनी केले होते. उद्योजक विजय गोपाळे यांनी आभार मानले.
- मराठी माध्यमांच्या शाळा स्मार्ट व डिजिटल बनवणे काळाची गरज – संतोष खांडगे
- सदाबहार गीतांनी दिला चिरतारुण्याचा प्रत्यय
- रविवार,०५ जानेवारीला तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन
- महर्षी कर्वे आश्रम शाळेचे सोळावे वार्षिक संमेलन उत्साहात संपन्न
- मावळात आज पासून किर्तन महोत्सव : आमदार सुनिल शेळके व विठ्ठल परिवाराचा पुढाकार