वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २४ वा वर्धापन दिनानिमित्त   वडगाव शहरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विचार धरेतील ज्येष्ठ कार्यकर्ते व कालवश कार्यकर्ते ज्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी योगदान दिले पक्षाच्या अडचणी काळात साथ सोबत दिली अश्या मान्यवरांचे स्मरण ठेवून त्यांचा यथोचित सन्मान करून गौरव केला .

 सुमारे २०० ज्येष्ठ मान्यवर व दिवंगत कार्यकर्ते यांच्या कुटुंबातील सदस्य    यांचा ट्रॉफी सन्मान  देऊन 

सोहळा आयोजित केला होता.

 या प्रसंगी आमदार सुनील शेळके,तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,. माजी कृषी सभपती बाबुराव वायकर,महिला अध्यक्ष दिपली गारडे,माजी सभापती विठ्ठलराव शिंदे,माजी सभापती गणेश ढोरे,युवक अध्यक्ष किशोर सातकर, वडजाव शहराध्यक्ष अतुल वायकर बाजार समिती सभापती संभाजी शिंदे,उपसभापती नामदेव शेलार,अंकुश आंबेकर, काळुराम मालपोटे,सुभाषराव जाधव, तुकाराम ढोरे, ओबीसी अध्यक्ष महिला संध्या थोरात, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्राचे नियोजन माजी नगरसेवक सुनील ढोरे यांनी केले होते.  दरम्यान सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त  जिल्हा बॅकेजवळ झेंडा वंदन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष प्रवीण ढोरे, सोमनाथ धोंगडे, विकी ढोरे, बंटी वघावले,संदीप ढोरे,शैलेश वाहिले,शरद ढोरे,मयूर गुरव,विशाल चव्हाण, प्रणव पटेकर,गणेश ढोरे, ओबीसी अध्यक्ष मंगेश खैरे यांनी केले.सूत्रसंचालन नगरसेवक चंद्रजीत वाघमारे व अतुल राऊत यांनी केले.

error: Content is protected !!