पुणे:
राष्ट्रवादीच्या २४व्या वर्धापन दिनीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपावली आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडे आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर आहेत,त्यांंनी पुण्यामध्ये असलेल्या गांधी स्मारकाला अभिवादन करत आपल्या कामाला सुरुवात केली.

आणि  नागरिकांच्या भेटीगाठीला सुरुवात केली आहे. ना कुठला लवाजमा ना कुठली सुरक्षा; सगळीकडे फक्त महाजनांच्याच साधेपणाची चर्चा!सुळेंची प्रतिक्रिया दरम्यान शनिवारी सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

माझ्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिल्याबद्दल मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. पवार साहेब, सर्व ज्येष्ठ नेते, पक्षाचे सहकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे आभार मानते. पक्षातील सर्व कार्यकर्ते ज्यांच्यामुळे आपण हा पल्ला गाठू शकलो. त्यांच्यासोबत काम करून , राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी मजबूत करण्यासाठी मी परिश्रमपूर्वक काम करेल’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

error: Content is protected !!