शासनाची भूमिका व योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यास पत्रकारांची महत्त्वाची भूमिका: जिल्हाधीकारी दिपा मुधोळ- मुंडे
बीड (प्रतिनिधी श्रावणी कामत ):
पत्रकार हा समाजातील महत्त्वाचा घटक असून. शासनाच्या भूमिका व योजना या सर्वसामान्य पोहोचवण्या साठी पत्रकारांची भूमिका ही खूप महत्त्वाची ठरते व यापुढेही पत्रकारांनी तशा स्वरूपाचे कार्य सातत्याने करत राहावे असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा स्तरीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी बोलताना केले.

    मराठी पत्रकार परिषद, शाखा बीड-परळी यांचे वतीने बीड येथे आयोजित मराठवाडास्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा  उत्साहात संपन्न झाला. यावेळी समारोप सञाचे समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठी पञकर परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख हे तर प्रमूख पाहूणे म्हणून  जिल्हाधिकारी  दिपाताई मुधोळ , जिल्हापोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्य चिकीत्सक  डाॕ सुरेश साबळे प्रमुख पाहुणे म्हणून  होते.
   

जिल्हा माहीती अधिकारी वाघ, काँग्रेसआयचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमूख परीषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी राज्य जनसंपर्क प्रमूख अनिल महाजन सहायक निवडणूक अधिकारी सुरेश नाईकवाडे सोशल मिडीया सेल चे राज्य समन्वयक अनिल वाघमारे, विभागीय संघटक सुभाष चौरे, प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष विशाल सांळूके, जिल्हा कार्याध्यक्ष  सतिश बियाणी व जिल्हा उपाध्यक्ष  रवि उबाळे जिल्हा प्रसिध्दीप्रमूख सजंय हंगे उपस्थित होते.

यावेळी गुणवंत पञकाराचे पाल्याचा सत्कार करण्यात आला, यावेळी पञकार उत्तम हजारे यांचे सुपुत्र नोबेल हजारे हा उच्च शिक्षणा साठी तैवान ला तर डाॕ सुजीत हजारे एम बी बी एस पुर्ण केल्या बद्दल तर नंदीका कामत हि दहावी परीक्षेत यश संपादन केल्या बद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालूका संघाना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी पञकाराची ताकद खुप मोठी असते विवीध क्षेञात चांगल काम करणारे व्यक्तीला कामाला प्रोत्साह पञकरा मुळ मिळत प्रशासन शासन व पञकार हे समाजा साठी महत्वाचे घटक असल्याचे सांगत. पञकारानी चांगले कामा साठी प्रशासनास सहकार्य करण्याचे अवाहण केले.

अध्यक्षीय भाषणात एस एम देशमूख यांनी पञकार सामाजीक कार्याशी कसे जोडलेले असतात हे उदाहरण  सांगून सांगीतले या जिल्हा संघाने तलावातील गाळ काढण्याचे उत्कृष्ट काम केल्याचे सांगीतले. यापुढे संघटीत पणे पञकार चांगले काम हाती घेतील. पञकाराचे व संपादकाचे प्रश्न सोडवण्या कडे प्रशासनाने व अधिका-यानी लक्षद्यावे आशी मागणी केली. यावेळी जिल्हापोलीस अधिक्षक नंदकूमारठाकूर यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी सुञसंचलन धंनजय आरबूने यांनी तर अभार विशाल साळुंके यांनी मानले यावेळी मराठवाड्याचे सर्व जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!