जागतिक पर्यावरण दिनी मेदनकरवाडीत वृक्षारोपण
चाकण:
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मेदनकरवाडी येथील वन विभागाच्या जमिनीवरील रिकाम्या जागेत वनपरिक्षेत्र चाकण वनविभाग चाकण,संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर व विविध कंपन्या,सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ४० प्रजातीच्या ५००० रोपांची लागवड करण्यात आली.
या जातींवर संशोधन करण्यात येत आहे.काही दिवसातच वृक्ष लागवडीचे महत्त्व समजेल.संबंधित शेतकऱ्यांना या लागवडीचा फायदा होणार आहे.असे योगेश महाजन वनपरिक्षेत्र अधिकारी व एम यु जाधवर वनपरिमंडळ अधिकारी चाकण यांनी सांगितले.
लागवड योगिता नायकवडी (वीर) वन परिमंडळ अधिकारी चाकण, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.याच बरोबर कडूनिंब,वड,पिंपळ,हिरडा आंबा,चिंच,या जातीच्या वृक्षांच्या जातींचे वृक्षारोपण करण्यात आले.आज एकूण ५००० झाडांचे वृक्षारोपण केले.संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या हस्ते रोपांचे पुजन झाले.
सहभागी झालेल्या सभासदांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.संस्कार प्रतिष्ठानचे प्रविण भामरे, सुनिता सपाटे, सातपुते उपवनरक्षक जुन्नर, संदेश पाटील, सहा.उपवनरक्षक जुन्नर ,वाय एस महाजन वनपरिक्षेत्र अधिकारी,एस यु जाधवर वनपरिमंडळ अधिकारी चाकण, ए ए गवळी वनरक्षक, रेश्मा गायकवाड,आरोडे, आगरकर, रावते,पाटोळे,पोत्रे,श्रीमती जगताप, उबाळे, देवानंद सैद यांनी संयोजन केले.
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!