आजच्या परिस्थितीत सुद्धा पत्रकार निर्भयपणे काम करतात हे कौतुकास्पद : विश्वंभर चौधरी
मराठी पत्रकार परिषद शाखा बीड आयोजित मराठवाड्यातील पत्रकारांचे अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा
बीड (श्रावणी कामत):
देशात उद्भवत असलेल्या गंभीर परिस्थितीचा सध्या विचार करण्याची गरज आहे. आज पत्रकारांच्या उपजीविकेवर सुद्धा हल्ले केले जात आहे. अशा हल्ल्यांना रोखायचं कसं? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
पण अशाही परिस्थितीत अनेक पत्रकार निर्भयपणे काम करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे. निर्भयपणे काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या येणाऱ्या काळात वाढली पाहिजे,’ असे प्रतिपादन निर्भय बनो अभियानचे डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केले.
मराठी पत्रकार परिषद शाखा बीड आयोजित मराठवाड्यातील पत्रकारांचे अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर निर्भय बनो अभियानाचे ऍड. असीम सरोदे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.एम. देशमुख, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, राज्य सरचिटणीस मन्सुरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, सोशल मिडीया राज्य समन्वयक अनिल वाघमारे, सहाय्यक राज्य प्रसिद्ध प्रमुख संदीप कुलकर्णी,
राज्य निवडणूक विभाग प्रमूख बाळासाहेब ढसाळ, सहायक निवडणूक प्रमूख सुरेश नाईकवाडे, विभागीय संघटक प्रकाश काबंळे आदी उपस्थीत होते.
विश्वभंर चौधरी म्हणाले, ‘परिषद व निर्भय बनो एकच ध्येय आहे. या देशातील वाईट वातावरणाच्या विरूध्द एकञ होणे गरजेचे आहे. देशामध्ये बेकारी दहा टक्क्यांनी वाढली आहे.. महागाई निर्देशांक वाढला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याना ईडी नोटीस दिली जातेय. काही भाजपात गेले म्हणून ईडी कारवाई थांबली. आगामी आंदोलन ईडी विरूध्द निर्भय बनोचे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशाचं राजकारण हिंदुत्वाच्या दिशेने चालला आहे. परंतु येथे हिंदू ची व्याख्या चुकीचे पद्धतीने केली जात आहे. मी सुद्धा हिंदू आहे. त्यामुळे आता आम्हाला हिंदुत्व इतरांनी शिकवू नये, असे ते म्हणाले. मी कुठल्या पक्षाच्या दावणीला बांधलेला नाही. निर्भय बनो चळवळ हि सर्वच धर्मातील धर्मांधांच्या विरोधात आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
अॕड.असीम सरवदे यांनी सांगितले की, ‘मानवी मुल्य असलेल्या व अन्यायाचे विरोधातील सामाजीक हिताचे वृत्त प्रकाशीत करण्याकडे पञकारिनी लक्ष द्यावे. सामाजिक न्यायासाठीची पञकारीता करा. सत्य धरून पञकारानी चालावे. इलेक्ट्रॉनीक मिडीया साठी स्वतंञ कायदा करा,’ असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकारांसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषेदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख म्हणाले, ‘ मराठी पत्रकार परिषदेचे उपक्रम सातत्याने राज्यभर होत असतात. पत्रकारांना संघटित करण्याची भूमिका मराठी पत्रकार परिषदेने घेतले आहे. देशाच्या ज्या पद्धतीचे वातावरण आहे, अशा वातावरणात निर्भयपणे पत्रकारिता करता यावी, हे संघटना खूप महत्त्वाचं आहे.
पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे काम हे काहीजण करतात. पण मराठी पत्रकार परिषद ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. सर्वसामान्य पत्रकारांचे प्रश्न मांडून त्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करण्याचे काम पत्रकार परिषद करते आहे. पत्रकारांकडून समाज करीत असलेल्या अपेक्षा मान्य आहेत. पण पत्रकारांच्या सुद्धा समाजाकडून काही अपेक्षा आहेत. पत्रकाराच्या संकटप्रसंगी समाजाने त्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे.
समाजा पत्रकारांच्या मागे उभा राहिला, तर आम्ही अधिक निर्भयपणे काम करू,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा झाल्यानंतर पत्रकारांवर होणारे हल्ले कमी झाले, पण पत्रकारांवर आता खोट्या केसेस दाखल करण्याचे प्रमाण वाढला आहे,’ असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल महाजन यांनी केले. आभार विभागीय संघटक सुभाष चौरे यांनी मानले.
याप्रसंगी स्व.माणिराव देशमूख स्मृती पुरस्कार हे स्व. माणिकराव देशमूख सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात आले. पञकार भुषण पुरस्कार ज्येष्ठ संपादक दिलीप खिस्ती, समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ता मनिषा तोकले, कृषी भुषण पुरस्कार शेतीनिष्ठ शेतकरी कल्याणराव कुलकर्णी यांना देण्यात आला. तर बीड जिल्हा मराठी पञकार परिषदेच्या वतीने दिले जाणारे स्व. सुंदरराव सोळंके स्मृती पञकारीता पुरस्कार सुर्यकांत नेटके, स्व. प्रभाकर कुलकर्णी स्मृती श्रमीक पञकारिता पुरस्कार अनिल जाधव व स्व. कांताबाई स्मृती पुरस्कर सुभाष सुतार यांना देण्यात आला. पुरस्कार्थींच्या वतीने मनीषा तोकले यांनी मनोगत व्यक्त केले.
- महेंद्र भारती यांनी सामाजिक एकोपा केला निर्माण :डॉ. श्रीपाल सबनीस
- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर
- ले.डॉ.संतोष गोपाळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या एनसीसी शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचे चित्रकला स्पध्रेत यश
- अनुसया दत्तात्रय निंबळे यांचे निधन