• संगीतातला सूर आणि जीवनातला नूर गेला तर– जीवन भेसुर होणार- कसे ते प्रत्यक्ष पाहूया— जीवनाविषयी
  अतिशय सुरेख भाष्य
  ” बेगर्स डॉक्टर” म्हणून काम करणारे “डॉक्टर सोनवणे” यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं! त्यांनी जीवनाविषयी असं म्हटलं होतं की,
  “संगीतातला सूर गेला तर संगीत बेसूर होत, त्याचप्रमाणे जगण्यातला नूर गेला तर जगण सुद्धा भेसूर होतं”! बस याच त्यांच्या जीवनसत्वाच्या धाग्याला धरून मी आपल्याशी आज संवाद साधत आहे!
  मित्रांनो- एका देवळात असं लिहिलं होतं, जर जीवनात कोणाची सेवा करायची असेल तर वेळेसाठी घड्याळ बघू नका! ह्याच देवळातील देवाचा प्रसाद घ्यायचा असेल तर त्याचा स्वाद बघू नका! सत्संग ऐकायचं असेल तर जागा बघू नका! आपल्याला एखाद्याला विनंती करायची असेल तर त्यात आपला स्वार्थ बघू नका आणि शेवटी समर्पण करायचं असेल तर खर्च बघू नका!
  मित्रांनो किती छोट्या छोट्या अशाच गोष्टीतून आपण आदर्श जीवन कसं जगावं याची गुरुकिल्लीच आपल्याला सापडलेली आहे! कारण माणूस आपल्या कर्मा विषयी अंतर मनात न डोकावता तो नशिबाला दोष देत बसतो, वास्तविक माणसांच्या सर्व समस्यांची कारणे दोन आहेत,
  तो नशिबा पेक्षा जास्त अपेक्षा करतो आणि आपलं कर्म संपण्याच्या वेळेआधी त्याचं फळ मिळण्याची आशा करतो आणि मग पर्यायाने त्याच्यापुढे समस्या उभी राहते!
  वास्तविक आपल्याला विशिष्ट ध्येय गाठायच असेल तर त्या त्या क्षेत्रातील अनुभव संपन्न, ज्ञान संपन्न व्यक्तीचा सल्ला घेणे, त्या त्याला मिळालेल्या सल्ल्याच प्रत्यक्ष कृतीत रुपांतर करण हे ज्याने निष्ठापूर्वक केलेल आहे त्याला कधीच अपयशाला सामोरं जावं लागत नाही हे आणि हेच शाश्वत सत्य आहे!
  मित्रांनो- जीवनात आम्ही अशाप्रकारे संकल्पित ध्येय मार्गावर प्रवास केल्यानंतर आपल्याला निश्चितच यश मिळतं! मग मिळालेल्या यशामुळे आपण अहंकाराने सुखावतो !अशावेळी आपणच मनाशी हा विचार केला की,
  मी आज ज्या यशाच्या शिखरावर पोहोचलो आहे त्या आधी कोणीतरी तिथ येऊन गेलेला आहे! बस, मित्रांनो हा अत्यंत महत्वाचा विचार आहे कारण असं म्हटले जात की अतिउच्च पदी थोरही बिघडतो!ही म्हण जर खोटी ठरवायची असेल तर मला आपल्या विचारात आणि पर्यायाने माझ्याच आचरणात अहंकाराच्या कलीला मी प्रवेश देता कामा नये!
  मित्रांनो –आजचा विषय समजायला जरी सोपा असला तरी प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आपल्याला आपल्याच मनाला लगाम ठोकावी लागेल!
  मित्रांनो -मी आपल्यासाठी परमेश्वर चरणी अशी प्रार्थना करतो की आपण यात निश्चितच यशस्वी व्हाल!
  ( शब्दांकन- ला.डाॅ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)
error: Content is protected !!