टाकवे  बुद्रुक:
वादळी वा-याने आंदर मावळातील  कळकराईच्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत उडाले आहे. एकावर्ग खोलीचे एका बाजूच्या छतांचे  पत्रे उडून गेले आहे .

प्रशासनाने याची दाखल घेऊन शाळा सुरु होण्यापुर्वी शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी कळकराई ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांनी केली आहे.

दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळात शाळेचे पत्रे उडाले, अँगल  तुटून पडलेत. पावसामुळे वर्गखोलीतील साहित्याची नुकसान होऊ शकते,याची  दखल घेत शाळा दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करावे अशी ग्रा.प सदस्य , भरत  साबळे, सचिन तळपे आणि ग्रामस्थ आणि तरूण मंडळाने केली आहे.

error: Content is protected !!