टाकवे बुद्रुक:
भोयरे ग्रामपंचायतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायतींच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन स्थानिक महिलांचा गौरव करण्यात आला.
मोनिका बाळू जांभुळकर व वैशाली कृष्णा जांभुळकर यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सरपंच वर्षा अमोल भोईरकर,उपसरपंच ऋषिकेश तानाजी खूरसूले, ग्रामसेवक प्रमिला मारुती सुळके,ग्रामपंचायत सदस्य बाळू तानाजी भोईरकर, रामदास पारू भोईरकर, दिपाली जांभुळकर, नीता भोईरकर रंजना भोईरकर, संगीता वाघमारे मंदाताई आडीवळेअंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व उपस्थित ग्रामस्थ होते.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन