वडगाव मावळ:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १०१  वा मन की बात हा कार्यक्रम भाजपा सांकृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळा  भेगडे , सिनेअभिनेत्री सांकृतीक प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष प्रिया  बेर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत  कान्हे ता.मावळ येथे घेण्यात आला.

“मन की बात  हा कार्यक्रम संपल्यानंतर गौरी वनारसे महाराष्ट्रतील तीन महिला सुप्रसिद्ध संबळ वादका पैकी एक आहे.त्यांनी संबळ वादन केले.

       भाजपा सांकृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश वतीने प्रदेश संघटकपदी वेदांत महाजन यांची निवड करण्यात आली .तसेच इतर काही निवडी करण्यात आल्या.

यावेळी निर्माते अमर गवळी ,अभिनेत्री,संपर्क प्रमुख महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ विद्या पोकळे पाटील ,सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक चेतन चावडा ,नृत्य दिग्दर्शक भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ पुणे शहर अध्यक्ष जतिन पांडे , भाजपा नेते राजेंद्र सातकर,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,बुथ अध्यक्ष संतोष सातकर ,कामशेत शहर अध्यक्ष प्रविण शिंदे, अशोक सातकर उपस्थित होते.

error: Content is protected !!