तळेगाव स्टेशन (स्वप्ननगरी):
जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या झाली, या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवारे यांच्या निवासस्थानी जाऊन किशोर आवारे यांना श्रद्धांजली वाहून आवारे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
आवारे यांच्य मातोश्री माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी “माझा मुलगा तळेगावकरांची प्राणपणाने सेवा करत होता. न्याय मिळायला पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,” अशी मागणी केली. तसेच या हत्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्याची मागणी किशोर आवारे यांच्या पत्नीने पाटील यांच्याकडे केली.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांना धीर दिला. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
- महेंद्र भारती यांनी सामाजिक एकोपा केला निर्माण :डॉ. श्रीपाल सबनीस
- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर
- ले.डॉ.संतोष गोपाळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या एनसीसी शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचे चित्रकला स्पध्रेत यश
- अनुसया दत्तात्रय निंबळे यांचे निधन