तळेगाव दाभाडे – आद्य पत्रकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या निर्भीड पत्रकारितेची आजही समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज पं.सुरेश साखवळकर यांनी केले.
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांचे 177 व्या पुण्यतिथी निमित्ताने तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे वतीने आयोजित अभिवादन सभेत पं साखवळकर हे बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी मनोहर दाभाडे हे होते.
यावेळी बोलताना पं.साखवळकर म्हणाले की आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा काळ अतिशय खडतर होता. आपल्या देशात इंग्रजाची एकहाती सत्ता होती. तर भारतीय समाज विविध जाती धर्म रुढी परंपरांमध्ये अडकल्याने समाजात एकी नव्हती. अशावेळी आचार्य बाळशास्री जांभेकर यांनी आपली निर्भिड लेखणी चालवली.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी आचार्य बाळशास्री जांभेकर यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. पत्रकार संघाचे सचिव सोनबा गोपाळे गुरूजी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर राजेश बारणे यांनी आभार मानले.
यावेळी श्री बी एम भसे, सोनबा गोपाळे गुरूजी,सुनील वाळुंज, तात्यासाहेब धांडे, अतुल पवार, प्रभाकर तुमकर, राजेश बारणे, राजेंद्र जगताप, श्रीकांत चेपे आदी उपस्थित होते.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष