डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव-कातवीतील ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी मोफत पीएमपीएमएल बस सेवा पास वाटपचा शुभारंभ

वडगाव मावळ:
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने वडगाव शहरातील जेष्ठ नागरिकांना आज पीएमपीएमएल बस सेवेचे मोफत पास देण्यात आले.

वडगाव मधील पंचमुखी मारुती मंदिर परिसरात जेष्ठ नागरिक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथमता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत या कायमस्वरूपी मोफत बस पास सेवा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी ग्रा.पं. सरपंच नंदाताई ढोरे, वडगाव रा. काँ. ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष शांताराम कुडे, सामाजिक कार्यकर्ते नितीन भांबळ, एँड. शामराव ढमाले, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत झरेकर, हभप विठ्ठल ढोरे, रा. काँ. युवक शहराध्यक्ष अतुल वायकर, वडगाव रा. काँ. सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गणेश पाटोळे, प्रभाग क्रमांक सात चे अध्यक्ष अशिष भालेराव, उद्योजक अजय भवार, किरण ओव्हाळ, विकी कदम आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडगाव शहरातील वय वर्षे ६० पूर्ण असणाऱ्या आज एक्कावन जेष्ठ नागरिकांना प्रतिनिधीक स्वरूपात मोफत बस सेवेचे पास वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत बस पास सेवेचा उपक्रम हा कायमस्वरूपी चालू ठेवण्यात येणार आहे. यावेळी अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिकांना दिली.

याव्यतिरिक्त वडगाव शहरातील अजून कोणत्याही जेष्ठ नागरिकांना दररोज अथवा महिन्याचा पास काढून पाहिजे असल्यास जनसंपर्क कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधून शासनाने ठरवून दिलेल्या आवश्यक अशा कागदपत्रांची पूर्तता करून मोफत पास घेऊन जावे असे आव्हान नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी वडगाव शहरातील ज्येष्ठ नागरिकांना केले आहे.

error: Content is protected !!