
घोणशेत ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी योगेश शंकरराव चोरघे
टाकवे बुद्रुक:
घोणशेत ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश शंकर चोरघे यांची निवड झाली.मावळत्या उपसरपंचानी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच अंकुश खरमारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ
उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी कविता चोरघे मच्छिंद्र कचरे व रूपाली गरुड यांचे अर्ज दाखल झाले नियोजित वेळेत कविता चोरघे व मच्छिंद्र कचरे यांनी माघार घेतल्याने योगेश चोरघे व रुपाली गरुड यांच्यात निवडणूक होऊन योगेश चोरघे यांची बहुमताने निवड करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गजानन खरमारे, कविता चोरघे, सपना चोरघे, लक्ष्मीबाई पालवे,मनीषा रक्षे, माचिंद्र कचरे आदी सह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
उपसरपंच पदी योगेश चोरघे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना माजी सरपंच यदुनाथ चोरघे, ज्ञानेश्वरजी चोरघे, रोहिदास असवले, सुरेश चोरघे, दत्ता असवले, रोहिदास शिंगाडे, लक्ष्मण चोरघे,विश्वास चोरघे सोमनाथ चोरघे, काळू घोजगे, संतोष मोकाशी, बाळासाहेब आसवले, बाळासाहेब चोरघे, सोमनाथ राक्षे, मंगेश चोरघे उपस्थित होते.





