भामा आसखेड:
भामा आसखेड धरणग्रस्त शेतकरी यांच्या आझाद मैदान मुंबई येथील बेमुदत धरणे आंदोलनाची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली.
भामा आसखेड धरणग्रस्त शेतकर्यांनी आझाद मैदान मुंबंई येथे धरणे आंदोलन केले. त्या आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली आणि धरणग्रस्त शेतकर्यांना पर्यायी जमिन वाटप करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू करण्यात आली.
पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता यांनी या बाबत सकारात्मक भुमीका घेतली व त्यांना योग्य ते सहकार्य जिल्हा पुनर्वसन अधिकारी-पुणे, संदेश शिर्के यांनी केले त्यांनी एका दिवसांमध्ये १६० धरणग्रस्त शेतकर्यांना १६/२ ची नोटीस देऊन इतिहासच घडवला.
खुपच वेगवान पध्दतीने या अधिकाऱ्यांने काम केले. अप्पर जिल्हाधिकारी -पुणे, यांची धरणग्रस्त शेतकरी यांचे सोबत झालेल्या बैठकीत ३८८ धरणग्रस्त शेतकर्यांना जमीन वाटपा संदर्भात ज्या काही त्रुटी आहेत त्या सर्व त्रुटींची पुर्तता करून द्यायला सांगितली आहे. त्रुटीची पुर्तता केली की शासन नियमा प्रमाणे प्राधान्य क्रमा नुसार जमीन वाटप केली जाईल.
जिल्हा पुनर्वसन अधिकारी व आंदोलक शिष्ट मंडळ यांचे मध्ये काही विषयावर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी आंदोलक शिष्ट मंडळाला आश्वस्त केले की लवकरच राजगुरुनगर (खेड) येथे दहा दिवसांचे शिबीर आयोजित केले जाईल व त्या शिबीरात १६० धरणग्रस्त शेतकऱ्यांचे कागदपत्रानुसार पात्रता तपासली जाईल त्यानंतर त्यांचे कडून चलन भरून घेण्यात येईल.
ज्या शेतकऱ्यांना कडे आवश्यक ती शासकीय कागदपत्रे नसतील तर ती कागदपत्रे त्यांना शासना कडून निशुल्क उपलब्द करून दिली जातील. जिल्हा पुनर्वसन अधिकारी लवकरच शिबीराची तारीख कळवतील त्या नुसार शिबिराची तारीख घरणग्रस्त शेतकर्यांना कळवली जाईल. (किंवा धरणग्रस्त शेतकर्यांनी थेट जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेशी संपर्क साधुन तारीखेची माहीती घ्यावी) सदरच्या कार्यवाहीमुळे जमिन वाटप करण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कोणत्याही धरणग्रस्त शेतकरी बांधवांनी निराश होऊ नये, थोडा विलंब होईल, पण धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लागतील,असा विश्वास धरणग्रस्त कृती समितीच्या नेत्यांनी व्यक्त केला.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन