वडगाव मावळ:
दिव्यांगांचे प्रश्न आव्हानात्मक जरी असले तरी आपले दिव्यांग बांधव यांच्यात तसूभरही आत्मविश्वासाची कमतरता नाही.त्यांच्यात कसलीही कमतरता नसून ते समर्थ आहेत, मेहनती आहेत. त्यांच्या जर अपेक्षा, काही मागण्या असतील तर त्या आपण प्राधान्याने पूर्ण केल्या पाहिजेत. त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या वतीने दिव्यांग बांधवना गरजेच्या वस्तू देण्यात आल्या यावेळी झालेल्या लोकार्पण सोहळ्यात खांडगे बोलत होते.
तालुकाध्यक्ष खांडगे म्हणाले,”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरून अशा प्रकारे केलेली मदत निश्चितच कौतुकास्पद आहे लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी दिलेल्या शिकवणीतून आपल्या सर्वाचे कार्य पुढे जात आहे.याचा मनस्वी आनंद देखील आहे.
कोणी अस्थिव्यंग, दृष्टिदोष, कर्णदोष, अंधत्व, अल्पदृष्टी असलेले तर कोणी मानसिकरित्या जन्मतः खचले आहेत. नियतीने जन्मतःच असे परावलंबित्व दिले. त्यात समाजाकडूनही फारशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे आत्मविश्वास गमावून बसलेल्या दिव्यांग बांधवांना पुन्हा एकदा स्वावलंबी करण्याचे काम करणारी कार्यकर्त्याची फौज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे.
आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दिव्यांग दिन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून दिव्यांग मेळावा साजरा करण्यात आला. या मेळाव्यामध्ये दिव्यांग बंधू आणि भगिनींना दोनशे ते अडीचशे लाभार्थ्यांना शासकीय अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला.
आमदार सुनील शेळके यांच्या वतीने गरजू दिव्यांगांना व्हीलचेअर, कुबड्या, काट्या ,वाकर, साहित्याची वाटप करण्यात आले. मावळ तालुक्यातील दिव्यांगांना सतत मदत करणारे सुनील शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,व संजय गांधी निराधार योजना समिती मावळ अध्यक्ष नारायण ठाकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक दिव्यांग सेलचे अध्यक्ष अध्यक्ष सुभाष शेडगे यांनी केले. व सूत्रसंचालन भरत जोरी आणि संदीप भोसलकर यांनी केले. तानाजी मराठे यांनी आभार मानले. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे अध्यक्ष पुष्पा गोसावी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग कार्याध्यक्ष निवृत्ती कामटकर, कार्याध्यक्ष जुन्नर महिला दिव्यांग सुनीता धुरासे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग भरत कोंडे, महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका दिपाली गराडे ,महिला जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुवर्णा राऊत,राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या अध्यक्षा संध्या थोरात, ओबीसी महिला अध्यक्ष पुष्पा घोजगे ?तालुका उपाध्यक्ष उमा शेळके ,युवती अध्यक्ष आरती घारे,नितीन मु-हे,पाचणे गावचे माजी सरपंच मनोज येवले दिवडगावचे माजी सरपंच लहू सावळे,माजी सरपंच शरद घोटकुले, उपाध्यक्ष साजन येवले,संदीप लोकरे ,भरत जोरी,वासुदेव लखीमले, संदीप भोसलकर, गणेश शेडगे , किसन गरवड ,गणेश रोहमारे, अनिल वाळुंज ,गुलाब कोंढरे, माया कुढले ,मीरा गराडे ,सारिका खिलारे ,संपत लांडगे, किसन सावळे, दीपक करे व अन्य मान्यवर उपस्थित होते.