भाजपा कार्यालयाचे नूतनीकरण तालुक्यात विजयाची मुहुर्तमेढ रोवणारे : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे
वडगाव मावळ :
तालुका भाजपाच्या वडगाव येथील मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण हे आगामी काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत,पंचायत समिती-जिल्हा परीषद व नगरपरीषदांसह सर्व निवडणुकांमध्ये भाजपाच्या मोठ्या विजयाची मुहुर्तमेढ रोवणारे ठरेल असा विश्वास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी कार्यालय नुतनीकरण प्रसंगी झालेल्या समारंभप्रसंगी व्यक्त केला. याप्रसंगी मा राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी राजमाता महिला मंच च्या संस्थापक, अध्यक्षा सौ सारीकाताई भेगडे यांचे हस्ते श्री सत्यनारायण पूजन करण्यात आले.
वडगाव नगरपंचायत मधील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक शंकर भोंडवे यांच्या सौजन्याने मावळ तालुका भाजपाच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून कार्यालयामध्ये जनसंघाच्या स्थापनेपासून भाजपाच्या आजच्या वाटचालीपर्यंतचा प्रवास थोडक्यात मांडण्यात आलेला आहे.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करत येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी मावळ तालुका भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात संघ जनसंघ ते भाजपा या वाटचालीत प्रत्येक कार्यकर्त्यांचे असलेले योगदान अमुलाग्र असल्याचे सांगितले आणि या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
ज्येष्ठ नेते शंकरराव शेलार , महिला मोर्चा अध्यक्ष सायलीताई बोत्रे , मावळ तालुक्यातील  आजी माजी सभापती , उपसभापती , नगरसेवक , पदाधिकारी , ज्येष्ठ मार्गदर्शक , युवा कार्यकर्ते , महिला भगिनी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपाचे वडगाव शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी केले.भाजयुमो अध्यक्ष विनायक भेगडे यांनी आभार मानले.

You missed

error: Content is protected !!