वडगाव मावळ:
पायी वारकरी कृतज्ञता सोहळा मावळ वारकरी सेवा समिति मित्र परिवाराच्या वतीने संपन्न झाला. आळंदी पंढरपूर पारी आणि कार्तिकी पायी वारी आळंदीचे निष्ठावान वारकरी यांचा सन्मान शाल श्रीफळ पुष्पहार सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
हभप गणेश महाराज जांभळे, अमोल भेगडे, खंडू आहेर , शिवभक्त विजय तिकोणे यांनी हा सोहळा यशस्वी करण्यात सहकार्य केल. यात पायी वारी करणारे वारकरी यांना निमंत्रित करून हरिपाठ,प्रवचन, पाद्यपूजन वारकरी पूजन व महाप्रसादाचे नियोजन करण्यात आला.
यावेळी दिंडी समाजाचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड आणि बैलजोडीचे मालक हभप बबन सातकर, योगेश सातकर , शांताराम ढाकोळ उपस्थित होते. मावळमधे प्रथमच असा सोहळा झाला. निष्ठावान वारकरी हेच खरे पूजनीय आहेत आणि यांची सेवा देवाला आवडणारी आहे. या भावनेन हे नियोजन केले असल्याचे ह.भ.प.दिलीप महाराज खेंगले म्हणाले.
- आमदार सुनिल शेळके यांना मंत्रीमंडळात संधी द्यावी :नाणोलीकरांचे फिरंगाई मातेला साकडे
- बाळासाहेब ढोरे यांचे निधन
- शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात शाळांनी सहभागी व्हावे: राजेश गायकवाड
- विद्या प्रसारिणी सभेचा प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट प्रकल्प पुरस्काराने श्री.बाळासाहेब खेडकर सन्मानित
- कान्हेत दिव्यांग दिन उत्साहात साजरा