पवनानगर:
शिवली येथे कै.गणपतराव मारुती आडकर यांनी स्थापन केलेल्या श्री गुरुदत्त मुर्तीच्या श्री दत्तजयंती सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त (दि.३)शनिवार पासून ६ दिवस अंखड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ४ ते ५ काकडा भजन,सकाळी ९ ते ११ गुरुचरित्र पारायण,सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ किर्तन, रात्री ९ नंतर हरिजागर असे असून यामध्ये प्रवचनकार ह.भ.प.सुनील महाराज वरघडे,ह.भ.प.जालिंदर महाराज वाजे,ह.भ.प.शामराव महाराज फाळके,ह.भ.प.कालिदास महाराज टिळे,ह.भ.प.महादेव महाराज घारे यांची प्रवचने होतील. तर
किर्तनकारह.भ.प.तुषार महाराज दळवी,ह.भ.प.पद्माकर महाराज पाटोळे,ह.भ.प.वैभव महाराज राक्षे,ह.भ.प.पंडित महाराज क्षिरसागर, ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे यांची किर्तने होतील. आबा महाराज गोडसे यांचे काल्याचे किर्तन होईल.

error: Content is protected !!